Monday, June 17, 2024

ऑनलाईन शेअर ट्रेडींग करणार्‍याला 11 लाखांना गंडा, तिघांविरूध्द अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल

अहमदनगर-ऑनलाईन शेअर ट्रेडींग करणार्‍या व्यक्तीला ऑफलाईन शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करण्यासाठी पैसे गुंतवणूक करण्यास सांगून 11 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्जुन विठोबा शिंदे (वय 54 रा. सुपा ता. पारनेर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदाबाद (गुजरात) येथील तीन व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरव पटेल, निलेश पटेल व चिराग पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. सदरचा प्रकार 19 जानेवारी 2024 ते 11 मार्च 2024 दरम्यान घडला असून 22 मे 2024 रोजी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे हे 2017 पासून ऑनलाईन शेअर ट्रेडींग करतात. महाराष्ट्रात ऑनलाईन ट्रेडींगमध्ये आपण एक लाख रकमेमध्ये एक लाख रकमेचीच ऑनलाईन ट्रेडींग करू शकतो याची त्यांना माहिती आहे. ते 19 जानेवारी रोजी नगरमधील नातेवाईकांकडे असताना त्यांना एक मेसेज आला. त्यांनी त्या मेसेजवरील व्यक्तीला संपर्क केला असता आरव पटेल नावाची ती व्यक्ती होती. ते गुजरात राज्यात ऑफलाईन ट्रेडींगची माहिती ट्रेडर्सला देत असल्याचे त्याच्याकडून शिंदे यांना समजले.

गुजरात राज्यात आपण एक लाख रुपयात ऑफलाईन ट्रेडींगव्दारे गुंतविलेल्या रकमेच्या 100 पट म्हणजे एक कोटी रुपयांची ऑफलाईन ट्रेडींग करू शकतो,असेही आरव पटेल याने सांगितले व त्याने गुजरातमधील ऑफलाईन ब्रोकर निलेश पटेल याचा मोबाईल नंबर दिला. शिंदे यांनी त्याला संपर्क केला असता त्याने डिमॅट खाते उघडण्याकरिता आग्रह धरला. शिंदे यांनी त्यांची कागदपत्रे डिमॅट खाते उघडण्यासाठी पाठविली. निलेश याने शिंदे यांना संपर्क करून डिमॅट खाते उघडले असून त्यात एक लाख रुपये गुंतवणूक करण्यासाठी ते पैसे नगरमधील कृष्णा खंडेलवाल (तेलीखुंट चौक) यांच्यामार्फत पाठविण्यास सांगितले. शिंदे यांनी एक लाख रुपये पाठविले.

दरम्यान शिंदे हे 5 मार्च रोजी माळीवाडा येथे असताना निलेश याने त्यांना फोन करून तुमच्या प्राप्त रकमेवर ऑफलाईन ट्रेडींग करण्यात आली आहे. त्यातून 28 लाख 20 हजार 594 रुपये नफा झाला आहे. परंतु गुंतवणूक ही तुमच्या प्राप्त रकमेपेक्षा जास्त रकमेची झाली असल्याने आपल्याला झालेला प्रॉफीट दिसून येत नाही. तरी तुम्ही तुमची जास्त गुंतवणूक केली गेल्याने आमचे अहमदाबदच्या ऑफीसला चिराग पटेल यांना कृष्णा इलेकट्रीकल्स, तेलीखुंट चौकचे मालक कृष्णा खंडेलवाल यांच्यामार्फत 10 लाख रुपये पाठवा. त्यावर शिंदे यांनी पैशांची जुळवाजुळव करून 7 मार्च रोजी दुपारी 10 लाख रुपये पाठवले. त्यानंतर त्या तिघांनी शिंदे यांचे फोन घेतले नाही व त्यांना ब्लॉक करून टाकले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे अधिक तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles