Tuesday, June 25, 2024

अकरावी प्रवेशासाठी अशी करा पूर्ण प्रक्रिया, प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

राज्यात दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका या भागासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता ५ जूनपासून रविवारी १६ जूनपर्यंत महाविद्यालयाचा पसंती क्रमांक भरता येणार आहे. २६ जून रोजी सकाळी दहा वाजता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर २६ ते २९ जून दरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. सध्या पहिल्याच प्रवेशफेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
५ ते १६ जून – प्रवेशासाठी पसंतिक्रम नोंदविणे, अर्जाचा दुसरा भाग ऑनलाइन सादर करणे, अर्ज लॉक करणे, अल्पसंख्याक, इनहाउस कोट्यासाठी ऑनलाइन पसंती नोंदविणे.
१५ जून – अर्जाचा भाग १ सायंकाळी ४ पर्यंत भरता येईल.
१८ ते २१ जून – भाग २ भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करणे व भाग २ लॉक करणे. गुणवत्ता यादीत दुरुस्ती करण्यास त्यावर हरकती नोंदविणे. त्याचे संबंधित उपसंचालकांकडून निराकरण करणे.
२२ ते २५ जून – प्रवेशासाठी जागांची निवडयादी वेबसाइटवर जाहीर करणे. फेरीचा कटऑफ जाहीर करणे.
२६ ते २९ जून – संबंधित जागेवर प्रवेश निश्चित कऱणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे. यावेळी कॉलेज लॉगिनमध्ये प्रवेश निश्चित करणे, रद्द करणे, प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहतील.
२९ जून – प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर नोंदविणे.
१ जुलै – दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे.
पुढील प्रवेश फेऱ्यांच्या संभाव्य तारखा
दुसरी फेरी – २ ते ८ जुलै
तिसरी फेरी – ९ ते १८ जुलै
विशेष फेरी – १९ ते २६ जुलै
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई महानगरक्षेत्रातील १ लाख ३३ हजार २९२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा पहिला भाग भरला आहे. त्यातीतल ७९ हजार ४८१ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक केले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles