Wednesday, November 13, 2024

जामखेड व राहाता तालुक्यामध्ये अवैध दारु विक्री करणारे 14 हॉटेलवर छापे

जामखेड व राहाता तालुक्यामध्ये अवैध दारु विक्री करणारे 14 हॉटेलवर छापे
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई.

आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

नमुद आदेशाप्रमाणे पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार बबन मखरे, अतुल लोटके, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, विशाल तनपुरे, प्रमोद जाधव तसेच बापुसाहेब फोलाणे, रणजीत जाधव व रोहित मिसाळ, नेम.तपास पथक अहमदनगर अशांचे दोन पथक तयार करून जामखेड व राहाता तालुक्यामधील विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले होते.

पथकातील पोलीस अंमलदार यांनी दिनांक 21/10/2024 रोजी जामखेड, राहाता व लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना दारू विक्री करणारे हॉटेलवर छापे टाकुण कारवाई केली. कारवाईमध्ये एकुण 14 गुन्हे दाखल करुन 14 आरोपींचे ताब्यातुन 65,040/- रुपये किंमतीची देशी विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई चालु राहणार आहे.पोलीस स्टेशन निहाय अवैध दारु विक्री करणारे इसमांविरुध्द करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे.

अ.नं. पोलीस ठाणे दाखल केसेसची संख्या जप्त मुद्देमाल किंमत आरोपी संख्या
1 जामखेड 8 47,080 8
2 राहाता 4 12,000 4
3 लोणी 2 5,960 2
एकुण 14 गुन्हे दाखल 65,040 14

सदर कारवाई मा.श्री. राकेश ओला साहेब,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, मा.श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग व मा. श्री. शिरीष वमने साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles