Thursday, January 23, 2025

नगर जिल्ह्यात १६ लाखाचा बनावट खतांचा साठा जप्त ; कृषी सेवा केंद्रावर कारवाई

१६ लाखाचा बनावट खतांचा साठा जप्त ; कृषी सेवा केंद्रावर कारवाई
(प्रतिनिधी विक्रम बनकर)
नेवासा तालुक्यातील जय किसान फर्टिलायझर अँड केमिकल्स या दुकानावर कृषी विभागाने बनावट खत निर्मिती साठ्यावर छापा टाकून १६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकान कृषी विभागाने सील केले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांना मिळालेल्या माहितीनुसार नेवासा तालुक्यातील जय किसान फर्टिलायझर अँड केमिकल्स या दुकानात बनावट खत निर्मिती होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, कृषी अधिकारी प्रताप कोपनर, बाळासाहेब कासार, रखमाजी लांडे, राहुल ठोंबरे, प्रवीण देशमुख, कृषी सहाय्यक दिलीप घोंळवे यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. सदर छाप्यात खत निर्मिती साठी लागणारे आवश्यक रसायने, खत, रिकाम्या खतांच्या बॅग, बॅग सिलिंग मशीन, व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कृषी केंद्राकडे घाऊक खत विक्रीचा कुठलाही परवाना तसेच उत्पादनाचा परवाना नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कृषी विभागाने सदर दुकान सील केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles