Saturday, January 18, 2025

नगर, पाथर्डी, शेवगांव तालुक्यात तीन रस्त्यांच्या कामासाठी १९ कोटींचा निधी

खा. नीलेश लंके यांची माहिती प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी नगर, पाथर्डी, शेवगांव तालुक्यात रस्ते

नगर : प्रतिनिधी

नगर, पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून १८ कोटी ६६ लाख २७ हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.
नगर तालुका हद्द मठपिंपरी ते डोबेलेवस्ती रस्ता ७ कोटी ७६ लाख ७८ हजार, पाथर्डी मांडवा मोहोज खुर्द कडगांव मिरी शंकरवाडी ते तालुका हद्द ५ कोटी ५५ लाख ४० हजार, शेवगांव राज्य मार्ग ५२ माळेगांव देवटाकळी मजलेशहर ते तालुका हद्द ४ कोटी १८ लाख ३० हजार असा निधी या तीन रस्त्यांसाठी मंजुर करण्यात आला आहे.
तीन तालुक्यांमधून रस्त्यांची मागणी करण्यात आल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी २१ जुन २०२४ रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देउन नगर तालुक्यात ९.१८ कि मी, पाथर्डी तालुक्यात ६ .९० कि मी, तसेच शेवगांव तालुक्यात ४ कि मी अंतराच्या रस्त्यांसाठी निधी मंजुरीबाबत पत्र दिले होते. हा निधी मंजुर करण्यासाठी खा. नीलेश लंके यांनी दिल्ली येथे पाठपुरावा केल्यानंतर तीनही कामांसाठी निधी मंजुर झाला असून तसे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांनी खा. नीलेश लंके यांना कळविले आहे.
रस्त्याच्या कामासाठी निधी मंजुरीसाठी खा. नीलेश लंके यांनी पाठपुरवा करून हा निधी मंजुर करून घेतल्याबद्दल तीनही तालुक्यातील नागरीकांनी खा. नीलेश लंके यांना धन्यवाद दिले आहेत.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles