Tuesday, June 25, 2024

नगर शहरात चैन स्नॅचिंग करणारे 2 आरोपी पावणेदोन लाख रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद

अहमदनगर शहरात चैन स्नॅचिंग करणारे 2 आरोपी 1,75,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 29/04/24 रोजी फिर्यादी गीता मुकूंद देशमुख वय 49, रा. श्रीनाथ कॉलनी, रासणेनगर, सावेडी अहमदनगर या रस्त्याने पायी जातांना त्यांचे समोरुन 1 अनोळखी इसम विना नंबर काळ्या रंगाचे मोटार सायकलवर येवुन फिर्यादी यांचे गळ्यातील 25,000/- रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र ओढुन तोडुन बळजबरीने चोरुन नेले बाबत तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 548/2024 भादवि कलम 392 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये चैनस्नॅचिंगच्या वारंवार घटना होत असल्याने मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदर गुन्ह्यामधील आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या आहेत.
नमुद आदेशान्वये दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात व पोलीस अंमलदार रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, फुरकान शेख, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, सागर ससाणे, रोहित येमुल, विशाल तनपुरे, किशोर शिरसाठ व अरुण मोरे अशांचे पथक नेमून अहमदनगर जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
स्थागुशा पथकाने अहमदनगर शहरात घडलेल्या चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचे ठिकाणी भेटी देवुन गुन्हा ठिकाणचे व आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज प्राप्त केले. प्राप्त फुटेजची पाहणी करुन फुटेजमधील संशयीत आरोपींचे फोटो गुप्त बातमीदारांना प्रसारित करुन आरोपी माहिती घेत असतांना पथकास दिनांक 24/5/24 रोजी गुप्तबातमीदारा मार्फत वरील प्रमाणे चैन स्नॅचिंगचा गुन्हा हा आरोपी नामे सलीम अफजल शेख रा. छत्रपती संभाजीनगर याने केला असुन तो बडी मस्जीद, मुकूंदनगर परिसरात आला आहे व चोरीचे सोने विक्री करणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच मुकूंदनगर परिसरातील बडी मस्जीद परिसरात जावुन सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील वर्णना प्रमाणे 1 संशयीत इसम व त्याचे सोबत 1 मुलगा रस्त्याने पायी चालत येताना पथकास दिसले. पथकाची खात्री होताच 2 संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख वय 54, 2) जिशान सलीम ऊर्फ सलीमोद्दीन शेख वय 21, दोन्ही रा. नवीन विडी वसाहत, कुंभारी, जिल्हा सोलापुर मुळ रा. कासीम ब-ही दर्गा, पढेगांव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे अहमदनगर शहरात चैन स्नॅचिंगचे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने तपास करता त्याने अहमदनगर शहरातील सावेडी व तारकपुर परिसरात चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी नामे 1) सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख वय 54, 2) जिशान सलीम ऊर्फ सलीमोद्दीन शेख वय 21 यांचेकडुन 1,75,000/- रुपये किमतीचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles