Thursday, March 20, 2025

अहमदनगर जिल्ह्यात महागड्या मोटार सायकल चोरी करणारे 2 आरोपी पोलीसांच्या ताब्यात

महागड्या मोटार सायकल चोरी करणारे 2 आरोपी,
3 मोटार सायकलसह स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 04/05/23 रोजी फिर्यादी श्री. कुणाल सुरेश गुप्ता वय 33, रा. क्रांती चौक, ता. राहुरी यांनी त्यांचे घरा समोर लावलेली 25,000/- रुपये किंमतीची बजाज पल्सर मोटार सायकल कोणीतरी अनोळखी चोरट्यांची चोरुन नेले बाबत राहुरी पो.स्टे.गु.र.नं. 468/2023 भादविक 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे.
अहमदनगर जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, रविंद्र घुगांसे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड व संभाजी कोतकर अशांचे पथक नेमुन मोटार सायकल चोरी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेवुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असतांना पथकास वर नमुद गुन्हा हा आरोपी नामे अमित नगरे रा. नेवासा याने त्याचे साथीदारासह केला असुन तो चोरीची पल्सर मोटार सायकल विक्री करणेसाठी पांढरीपुल, ता. नगर येथे येणार आले आता गेल्यास मिळुन येईल अशी गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच पांढरीपुल, ता. नगर येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे पांढरीपुल येथे 2 संशयीत इसम विना नंबर बजाज पल्सर मोटार सायकल जवळ उभे असलेले दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अमित अशोक नगरे वय 26, रा. नेवासा खुा, ता. नेवासा व 2) नाझिन अजिज शेख वय 22, रा. लक्ष्मीनगर, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. संशयीत उभे असलेल्या विना नंबर पल्सर मोटार सायकलचे कागदपत्राबाबत विचारपुस करता संशयीत सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल चौकशी करता त्यांनी राहुरी येथुन चोरी केलेली मोटार सायकल विक्री करण्यासाठी आलो असल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेवुन अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता वरील प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे आणखीन कोठे कोठे मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले या बाबत अधिक विचारपुस करता त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथुन 1 बजाज पल्सर व 1 केटीएम मोटार सायकल चोरी केल्याचे सांगुन दोन्ही मोटार सायकल या नाझिम शेख याचे घराचे पाठीमागे लावलेल्या आहेत अशी माहिती दिल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावुन पहाणी करता दोन्ही मोटार सायकल मिळुन आल्याने आरोपींना 1,25,000/- रु. किंमतीची बजाज पल्सर, 1,50,000/- रु. किंमतीची बजाज पल्सर व 1,75,000/- रु. किंमतीची केटीएम अशा एकुण 4,50,000/- रुपये किंमतीच्या 3 महागड्या मोटार सायकलसह आरोपींना राहुरी पो.स्टे.गु.र.नं. 468/23 भादविक 379 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.

आरोपींनी छत्रपती संभाजीनगर येथे मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुन्हे अभिलेचख पडताळणी करता 1) मुकूंदवाडी पो.स्टे.गु.र.नं. 379/2022 भादविक 379 व 2) मुकूंदवाडी पो.स्टे.गु.र.नं. 180/2023 भादविक 379 प्रमाणे 2 गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles