राहुरी पोलीस स्टेशन कडून दाक्षिणात्य चित्रपटात दाखवतात त्या प्रकारचे 2 घातक शस्त्र शाळा/महाविद्यालया समोर असभ्य वर्तन करणाऱ्या सहा तरुणांपैकी दोन आरोपीं कडून जप्त.
दिनांक 14/2 /2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की . राहुरी येथे शाळा कॉलेज परिसरामध्ये काही तरुण युवक हे शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनींना त्रास व्हावा या उद्देशाने असभ्य वर्तन करत आहे.सदर माहितीची शहानिशा करणे कामी व योग्य कारवाई करणे कामे पथक नेमले असता सदर पथकाने सहा असभ्यवर्तन करणाऱ्या युवकांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर कारवाई केली असता पैकी दोन युवकांनी दक्षिणात्य चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे हत्यारे बनवलेली असल्याचे समजले. त्यानुसार राहुरी डीबी पथकास आरोपी 1)अजित संभाजी शिंदे वय – 19 वर्ष रा. समर्थ नगर राहुरी फॅक्टरी ता. राहुरी जिल्हा अहमदनगर
2)विठ्ठल माणिक गरजे वय – 22 वर्ष रा. कामगार कॉलनी. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी जिल्हा अहमदनगर
यांनी दाक्षीणात्य चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे बनवलेले हत्यार त्यांचे राहते घरातून काढून दिले, म्हणून सदर इसमावर शस्त्र अधिनियम कलम 4 /25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
. गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार तुळशीराम गीते करत आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, विभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ , साहेब फौजदार तुळशीराम गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस नाईक प्रवीण बागुल ,पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे , पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, गोवर्धन कदम यांच्या पथकाने केलेली आहे.
राहुरी पोलीस स्टेशन मार्फत आव्हान करण्यात येते की अवैध्य शस्त्राबाबत काही माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
संजय ठेंगे
पोलीस निरीक्षक
राहुरी पोलीस स्टेशन