आजकाल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. शिवाय फेमस होण्यासाठी अनेकजण धोकादायक आणि विचित्र स्टंट करतात. यातील काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्या अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन मुली भरधाव बाईकवर विचित्र स्टंट करताना दिसत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन मुली भरधाव बाईकवर बसून विचित्र स्टंट करतआहेत. मुलींच्या या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्यावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी या मुलींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी तो पुन्हा नव्याने व्हायरल होत आहे.
मुलींच्या स्टंटचा व्हिडीओ @ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमधील मुलींनी बाईकचा हँडल सोडल्याचं दिसत आहेत. तर दोघी मुली एकमेंकीसमोर बसल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे भरधाव बाईकवरुन जाताना त्या दोघी एकमेकांना आधी मिठी मारतात आणि मग किस करतात. या स्टंटचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून आतापर्यंत ३ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.