Wednesday, April 17, 2024

अहमदनगर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबारप्रकरणी २ मोटार वाहन निरीक्षक निलंबित

नगर – नागपूर येथे कार्यरत असताना सरकारी रिव्हॉल्व्हरमधून सहकारी मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी सध्या नगरमध्ये कार्यरत असलेल्या महिला मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत पुरावा नष्ट केल्या प्रकरणी सध्या पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेले मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड या दोघांना राज्य शासनाने निलंबित केले आहे. गोळीबाराची ही घटना ७ मे २०२२ रोजी घडली होती. या घटनेत सुरुवातीला प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक संकेत भारत गायकवाड हे कर्तव्यावर जात असताना, ७ मे २०२२ ला सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास होलस्टरमध्ये (रिव्हॉल्व्हर ठेवण्याचे कव्हर) रिव्हॉल्व्हर ठेवताना त्यांच्या पायावरून उंदीर गेला. दचकल्याने गायकवाड यांच्या हातून रिव्हॉल्व्हर खाली पडले व त्यातून गोळी सुटली. ती उजव्या पायाच्या पोटरीत अडकली. त्यानंतर मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ व विरसेन ढवळे यांनी गायकवाड यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणाची बजाजनगर पोलिसांनी नोंद घेतली. गुन्हे शाखेच्या तपासात गायकवाड यांच्या पत्नी कोमल, वीरसेन ढवळे व गीता शेजवळ यांची साक्ष नोंदविल्यावर त्यात तफावत आढळली.

त्यामुळे १२ जानेवारी २०२४ रोजी नागपूरच्या बजाजनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गायकवाड यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तपासात नंतर मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महिला मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना भा.दं. वि.कलम ३०७ व आर्म अ‍ॅट कायदा कलम ३/२५ अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी केले आहे. विशेष म्हणजे, घटनेमध्ये गोळी लागून जखमी झालेले संकेत गायकवाड यांना कलम २०१ नुसार पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड व महिला मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना निलंबित केले आहे. तसे आदेश शासनाचे कार्यासन अधिकारी जयसेन इंगोले यांनी काढले आहेत. निलंबन कालावधीत संकेत गायकवाड यांचे मुख्यालय पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालय तर गीता शेजवळ यांचे मुख्यालय अहमदनगर आर टी ओ कार्यालय नेमण्यात आलेले आहे. या कालावधीत दोघांनाही वरिष्ठांच्या पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे या आदेशात म्हंटले आहे.
दरम्यान महिला मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर नागपूर येथे कार्यरत असताना सीमा तपासणी नायावर एका खाजगी इसमाकडून लाच घेतल्या प्रकरणी नागपूरच्या रामटेक पोलिस ठाण्यात दि. ५ मे २०२३ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा सन २०१८) चे कलम ७ (अ), १२ अन्वयेही गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचाही उल्लेख या निलंबन आदेशात करण्यात आलेला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles