Wednesday, January 22, 2025

आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

गोवा:-14

राज्य सहकारी बँका (SCB) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCB) यांच्या साठी इनजेनियस लीडरशिप समिट देशपांतळीवरील आयकॉनिकलीडर अवॉर्ड 2024 या वर्षी गोव्यातील विंडफ्लॉवर रिसॉर्ट आणि स्पा वर्का या पंचतारांकित रिसॉर्ट येथे संपन्न झाला.

2024 चा देशपांतली वरील जिल्हा सहकारी बँकेत केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल उत्कृष्ट चेअरमन म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार श्री शिवाजीराव कर्डिले यांना 2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर चा पुरस्कार अखिल भारतीय राट्रीय सहकारी संघ,नवी दिल्लीचे चेअरमन मा.खा.श्री. दिलीप संघवी यांच्या शुभहस्ते देण्यात आला.

या प्रसंगी गोवा विधानसभा अध्यक्ष नामदार श्री अनंत शेट, गोवा राज्याचे नामदार श्री.सुभाष फल देसाई, मंत्री समाज कल्याण, नदी व जलवाहतूक आणि पुरातत्व शास्त्र तसेच भारतातील राज्य सहकारी बँक व जिल्हा सहकारी बँकांचे अध्यक्ष, सीईओ,अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार स्विकारल्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले,जिल्हा बँकेवर विश्वास ठेऊन रुपये दहा हजार कोटीच्या वर ठेवीददरांनी ठेवी ठेवल्या असून जवळपास साडेसात हजार कोटीचे कर्ज येणी बाकी असून मी जिल्हा बॅंक व सामाजिक कार्याच्या माध्यमातून शेतकरी व समाजातील शेवटचा घटकांची सेवा करण्याचे कार्य केल्याने मला हा पुरस्कार मिळाला. राजकीय जीवनात हा पहिलाच पुरस्कार असल्याचेही माहिती श्री. शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

श्री.शिवाजीराव कर्डिले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटिल, मा.खासदार सुजय विखे पाटील,विविध जिल्हा बॅंकांचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्तानी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles