Tuesday, February 11, 2025

अहिल्यानगर जिल्यातील 2430 अंगणवाड्या होणार स्मार्ट; 39 कोटी 58 लाखांचा निधी

अहिल्यानगर -एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ उपलब्ध करून देण्यासाठी सन 2024-25 या वर्षाकरिता एकूण 2430 संच खरेदी करण्यासाठी 39 कोटी 58 लाख 80 हजार 800 रुपयांच्या रकमेची ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ खरेदी करण्यास व खर्चास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांना लवकरच स्मार्ट अंगणवाडी किट मिळणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत आरोग्य, पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरविण्यात येतात. यासाठी सदर अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूंपातर करणे आवश्यक आहे.

या केंद्रात मुलांना आनंददायी वातावरणात पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य, पोषण आहार देण्यात येईल तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षीत करता येईल यासाठी अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सोयी-सुविधांमध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगवाड्यात रूपांतरत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी ‘स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास निधी मंजूर करण्यात आला आहे. अंगणवाड्यांना भौतिकदृष्ट्या अद्ययावत केल्याने शैक्षणिक वातावरण निर्मिती, बालकांचा सर्वांगीण विविध उपक्रमाद्वारे महिला, बालके, किशोरींना विविध सेवा देणे यासाठी स्मार्ट अंगणवाडी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles