व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सोन्याची चैन कशी तयार केली जातेय, हे दाखवण्यात आलंय.या सोन्याच्या चैनला अगदी पारंपारिकरित्या घडवलं जातं. सोन्याची चैन घडवण्याची ही प्रक्रिया पाहून प्रत्येक जण हैराण झाले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुरूवातीला एक व्यक्ती सोनं घेऊन तो वितळवतो, साचामध्ये टाकतो आणि त्यानंतर त्याला हतोडीने लांब करतो. वितळून तयार केलेल्या मिश्रणावर आणखी वेगवेगळ्या प्रक्रिया करत छोट्या गोल कड्यांच्या आकारात बनवले जातात. हे वेगवेगळे छोटे गोल कडे नंतर एकात एक घालून त्यांना पॉलिश केल्यानंतर सोन्याची चैन तयार झालेली पहायला मिळते. इतक्या मेहनतीनंतर हा पीस बाजारात विकला जातो.
- Advertisement -