बिबट्याच्या हल्ल्यात मुत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन
२५ लाख शासन मदतीचे पत्र सोपवले
शिर्डी दि.१४, संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या संगीता शिवाजी वर्पे यांच्या कुटुंबीयांची महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट घेवून सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये मदतीचे शासन पत्र सोपवले.
पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून या परिसरात बिबट्यांचा असलेला वावर आणि याबाबत करावयाच्या उपाय योजनांबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी सूचना दिल्या. शिरापूर घाटात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याच्या तक्रारी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सांगितल्या. या तक्रारींची गांभीर्यपूर्वक दखल घेवून वन विभागाने ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्यांचा शोध घ्यावा. अशा सूचना पालकमंत्री श्री.विखे पाटील यावेळी दिल्या.
याप्रसंगी वन अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल, संगमनेर उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील, संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.