अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले 3 सराईत गुन्हेगार जेरबंद.
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन ते हद्दपार आदेशाचा भंग करुन अहमदनगर जिल्ह्यात बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास त्यांचेवर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, सफौ/ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे, अतुल लोटके, विशाल दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, रविंद्र पांडे, सुरेश माळी, पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, पोकॉ/जालिंदर माने, चासफौ/उमाकांत गावडे अशांची 2 पथके नेमून हद्दपार केलेल्या इसमांना चेक करुन मिळुन आल्यास त्यांचे विरुध्द कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन पथके रवाना केली होती.
त्याप्रमाणे पथक पारनेर तालुक्यात हद्दपार गुन्हेगारांना चेक करीत असताना पोनि/दिनेश आहेरयांना दिनांक 29/01/24 रोजी गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील हद्दपार इसम नामे 1) संजय बबन शेलार, वय 39, रा. पाडळी रांजणगांव, ता. पारनेर व हद्दपार इसम नामे 2) अजय विजय लोंढे वय 32, रा. कानिफनाथ गल्ली, हंगा, ता. पारनेर हे दोघे हद्दपार असताना लपूनछपून पारनेर तालुक्यात वास्तव्य करीत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास दिली. पथकाने नमुद हद्दपार इसमांचा शोध घेतला असता हद्दपार इसम मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द सुपा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
तसेच स्थागुशा पथक नेवासा सोनई परिसरात हद्दपार गुन्हेगारांना चेक करीत असताना पोनि/दिनेश आहेरयांना दिनांक 31/01/24 रोजी गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील हद्दपार इसम नामे 1) अमोल अशोक गडाख रा. सोनई, ता. नेवासा हा हद्दपार असताना लपूनछपून पारनेर तालुक्यात वास्तव्य करीत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास दिली. पथकाने नमुद हद्दपार इसमाचा शोध घेतला असता हद्दपार इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द सोनई पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद 3 हद्दपार इसम हे हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या अहमदनगर जिल्ह्यात वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे एकुण- 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील कार्यवाही संबंधीत पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्रीमती. स्वाती भोर मॅडल, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा.श्री. संपत भोसले साहेब, उविपोअ, नगर ग्रामिण विभाग व मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उविपोअ, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.