Saturday, October 5, 2024

राज्य सरकारचं दिवाळी गिफ्ट! ३ हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती

राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्वाची अन् आनंदाची बातमी. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मोठा निर्णय घेत आशा सेविकांची दिवाळी गोड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले. यावेळी राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडीसेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘प्रधानमंत्री मातृवंदना कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना “नवरात्र संपल्यानंतर मातेला वंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला या मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार तत्पर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कार्यक्रमात बोलताना”राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल.. अशी घोषणा केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली.

तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles