Saturday, May 18, 2024

30 लाखांची लाच…. आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

▶️ युनिट- बीड

▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 27 वर्ष,

▶️ आरोपी – 1) श्री.हरिभाऊ खाडे वय 52 वर्ष , पोलीस निरीक्षक ,आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधिक्षक कार्यालय बीड वर्ग १
रा चानक्यपुरी बीड
२) रविभुषन जाधवर सहायक फौजदार आर्थिक गुन्हेशाखा बीड
३) कुशाल प्रविण जैन वय 29 वर्ष रा मंत्री कॅालनी बीड खाजगी ईसम

▶️ लाच मागणी – १ कोटी रुपये तडजोड अंती ३० लाख रुपये

➡️ लाच पडताळणी –
दिनांक-14/05/2024

➡️ लाच स्विकारली – 5 लाख रुपये. ➡️दिनांक 15/05/204 रोजी मौजकर टेक्सटाईल सुभाष रोड बीड जि बीड

▶️ कारण – यातील तक्रारदार आणि त्याचा खाजगी चालक यांनी मासाहेब जिजाऊ मल्टी स्टेट बँकेचे संस्थापक संचालक बबन शिंदे यांचे शाळेच्या ईमारती च्या बांधकामा करीता मटेरीअल पुरवले होते . मोबदला म्हणुन ६० लाख रुपये बबन शिंदे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना दिले होते . तथापी पोलीस स्टेशन शिवाजी नगर बीड येथे बबन शिंदे व इतरांवर बॅंक अपहार प्रकरणी गुन्हा नं ३६०/२३ दाखल असुन तपास पोनी. खाडे आर्थिक गुन्हेशाखा बीड हे करत आहेत . यातील तक्रारदार व साक्षीदार यांना बबन शिंदे याने दिलेली 60 लाख रक्कम बॅंक अपहारातील आहे असे भासवून नमुद गुन्ह्यांत तक्रारदार व साक्षीदार यांना आरोपी करण्याचा धाक दाखवून तसेच तक्रारदार व साक्षीदार यांची मालमत्ता जप्त करण्याची भिती दाखवून यातील लोकसेवक जाधवर यांनी तक्रारदार यांचेकडे स्वत:साठी एक लाख रुपये मागणी करुन पोनी खाडे यांना लाच रक्कम मिळुन देण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच पोनी खाडे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना प्रत्येकी 50 लाख या प्रमाने 1 कोटी रुपये लाचेची मागणी करुन तडजोड अंती 30 लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले .तसेच तक्रारदार यांचेकडुन पहीला हप्ता म्हणुन 5 लाख रुपये खाजगी इसम कुशाल जैन मौजकर टेक्सटाईल यांचेकडे देण्यास सांगितले .
त्यावरुन दिनांक 15/05/24 रोजी सापळा कारवाईचे आयोजन मौजकर टेक्सटाईल सुभाष रोड बीड येथे केली असता
खाजगी इसम कुशाल जैन याने पोनी हरिभाऊ खाडे यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडुन पंचा समक्ष 5 लाख रुपये स्वीकारताच त्यास लाच रकमेसह पकडण्यात आले . पोनी खाडे सहायक फौजदार जाधवर व खाजगी इसम कुशाल जैन यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे .

▶️ सापळा अधिकारी –
शंकर शिंदे पोलीस उपअधिक्षक ला. प्र. वि .बीड. मो. नं.9355100100

▶️मार्गदर्शक- मा. श्री.संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.
9923023361
मा .श्री.मुकुंद आघाव, अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर 9881460103

➡️सह सापळा अधिकारी : पोलीस निरीक्षक युनुस शेख ला.प्र.वि.बीड 9765000784
संतोष घोडके पोनी
आणिता ईटुबुने पोनी ला.प्र. वि. छत्रपती संभाजीनगर
➡️सापळा पथक:- अविनाश गवळी , भरत गारदे,अमोल खरसाडे,अंबादास पुरी, हनुमान गोरे , सुरेश सांगळे , स्नेहल कुमार कोरडे
गणेश मेहेत्रे निकाळजे व नेहरकर
डला. प्र. वि.बीड.
#

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles