नगर शहरातील विविध रस्त्यांसाठी 33 कोटी 43 लाख 80 हजार रुपयाचा निधी मंजूर

0
33

नगर : शहराचा अनेक वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडे विविध विकास कामासाठी पाठपुरावा केला असून टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होत आहे त्यामुळे शहर विकासाला गती मिळाली आहे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे नियोजनबद्ध व कायमस्वरूपी मार्गी लागावी, यासाठी दर्जेदार कामाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे ही कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, राज्य सरकारच्या अर्थसंकल्प पुरवणी यादीमध्ये शहरातील विविध रस्त्यांसाठी 33 कोटी 43 लाख 80 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये शहरातील अत्यंत महत्त्वाचा ओळखला जाणारा रस्ता म्हणजे तारकपूर पत्रकार चौक ते डीएसपी चौकापर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यामध्ये आरसीसी साईट गटार, फुटपाथ, दुभाजक व पथदिवे ही कामे मार्गी लागणार आहे अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली
त्याचबरोबर केडगाव लिंक रोड रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असून उर्वरित राहिलेल्या कल्याण महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, हा पुणे कल्याण रोड महामार्गाला जोडणारा अत्यंत महत्वाचा रस्ता असून यावरील आरसीसी पुलाचे काम देखील मार्गी लागले आहे, त्यामुळे दळण वळणाच्या व शहर विकासाच्या दृष्टीने हा रस्ता महत्वाचा ठरणार आहे. तसेच नगर शहराला जोडणाऱ्या डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी बुरूडगाव साळुंखे मळा ते अहमदनगर महानगरपालिका कचरा डेपोपर्यंत रस्ता डांबरीकरण कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, केडगाव अर्चना हॉटेल ते नेप्ती रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम मंजूर असून उर्वरित नेप्ती बायपास पर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, केडगाव लोंढे मळा सोनेवाडी रस्ता बायपास पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नगर शहर मतदार संघातील सीना नदी, ओढे, नाले यावरती पूर्वी पाईप टाकून दगडी पूल तयार करण्यात आले होते, त्यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होत होती, या सर्व पुलाचे कामे मार्गी लागावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला होता यामध्ये बहुतांश आरसीसी पुलाची कामे पूर्ण झाली असून काही पुलाची कामे सुरू आहे त्यातच नगर शहराला जोडणारा वाकोडी भिंगार नाल्यावरील पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला असून त्या कामासाठी सुमारे २ कोटी ४४ लाख इतका निधी मंजूर झाला आहे ही सर्व कामे आता लवकरच सुरू होतील अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.