Tuesday, April 29, 2025

राज्यात आजपासून 4-5 दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या आणि परवा म्हणजेच 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान मुंबई महानगराच्या काही भागात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळणार नसला तरी, त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा आहे. मुंबईत कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. यापूर्वी 8 आणि 9 नोव्हेंबरलाही येथे अवकाळी पाऊस झाला होता प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे पालघर परिसरात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टी भागातून हा पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे.

तीन दिवसांपूर्वी उपनगरातील किमान तापमान 21 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते, मात्र मंगळवारी त्यात वाढ झाली. मात्र 24 नोव्हेंबरपासून मुंबईच्या आकाशात ढग जमा होऊ शकतात. त्यानंतर 25 तारखेला दुपार किंवा संध्याकाळपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. 26 तारखेलाही पाऊस पडण्याची शक्यता आहे.आजपासून महाराष्ट्राच्या दक्षिणकडे असलेल्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles