पारनेर परिसरात शेतवस्तीवर चोरी करणारे 4 सराईत आरोपी
3,57,500/- रुपये किंमतीचे 50 ग्रॅम सोन्याचे दागिन्यासह जेरबंद.
स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 06 जुन 2024 रोजी फिर्यादी श्री. अंकुश भाऊ भोसले वय 50, रा. खामकर झाप, वडगांव सायताळ, ता. पारनेर हे कुटूंबियासह घरात झोपलेले असतांना अनोळखी 4 इसमांनी फिर्यादीचे घरात प्रवेश करुन अज्ञात हत्याराने मारहाण व जखमी करुन घरातील 69000/- रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेले बाबत पारनेर पो.स्टे. गु.र.नं. 413/2024 भादविक 394, 34 प्रमाणे जबरीचोरीचा गुन्हा दाखल आहे.
घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना वर नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात व अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर व अरुण मोरे अशांचे पथक नेमुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
सदर सुचना प्रमाणे पथक दिनांक 08/06/2024 रोजी पारनेर परिसरात फिरुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत इसम नामे मिथुन उंब-या काळे रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा याने त्याचे इतर साथीदारासह केला असुन ते आता त्याचे घरी असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करता संशयीत आरोपी नामे मिथुन उंब-या काळे याचे घराचे मागील बाजुस असलेल्या लिंबाच्या झाडा खाली 5 ते 6 इसम बसलेले दिसले. पथकाची खात्री होताच लिंबाचे झाडा खाली बसलेल्या इसमांना चोहो बाजूंनी घेरुन ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना त्यांना पोलीस पथकाची चाहूल लागुन बसलेल्या इसमांपैकी 2 इसम पळुन गेले त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळुन आले नाहीत. उर्वरीत 4 संशयीतांना ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मिथुन उंब-या काळे वय 23, 2) अक्षय उंब-या काळे वय 26, 3) संजय ऊर्फ संज्या हातण्या भोसले वय 55 सर्व रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा व 4) गंगाधर संदल चव्हाण वय 21, रा. दिवटेवस्ती, वाघुंडे, ता. पारनेर असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत विविध प्रकारचे दागिने मिळुन आले. सदर दागिन्याबाबत अधिक विचारपुस करता त्यांनी काही दिवसापुर्वी वडझिरे शिवार, भनगडवाडी व वडगांव सावताळ ता. पारनेर परिसरात चोरी करुन आणले असल्याचे सांगितले.