Tuesday, February 27, 2024

अहमदनगर नगरसेवक सुनील त्रिम्बके यांच्यासह 4 जण कार अपघातात जखमी..

अहमदनगर -नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या साई संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने गणपतीपुळे आणि कोकण यात्रा प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपूर्वीच प्रभाग दोन मधील नागरिक जवळपास 37 ट्रॅव्हल्स बसने गणपतीपुळे आणि कोकण यात्रेसाठी नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या माध्यमातून रवाना झाले होते.

त्याचबरोबर सोबत सुनील त्र्यंबके आणि त्यांची इतर सहकारीही कारसह या ट्रॅव्हल्स वाहनांसोबत होते. यात्रा आटोपून परतत असताना आज पहाटे(सोमवार) साडेतीन वाजता पुण्याजवळ केडगाव चौफुली येथे नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या कारचा अपघात झाला असून यामध्ये चार जण जखमी झाले आहेत.

यामधील सुनील त्रंबके आणि अजून एक व्यक्ती यांना मार लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नगरमधून नगरसेवक निखिल वारे आदी त्यांचे सहकारी पुण्याकडे रवाना झाले आहेत. सुनील त्रिंबके यांची तब्येत चिंताजनक नसल्याची माहिती नगरसेवक निखिल वारे यांनी दिली. मात्र अपघातामध्ये मार लागल्यामुळे जखमी झाल्याने त्यांच्यावर पुण्यामध्ये रुबी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे निखिल वारे यांनी सांगितले आहे.

प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांसाठी दरवर्षी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षानिमित्त धार्मिक स्थळी यात्रेस आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने यंदाही गेल्या दोन दिवसांपूर्वीच या यात्रेसाठी जवळपास 37 ट्रॅव्हल्स बसमधून प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झालेले आहेत.

यात्रेतील सहभागी नागरिक सुरक्षित असून केवळ कार मध्ये असलेले सुनील त्र्यंबके आणि इतर तीन जण असे जखमी झाले आहेत. सुनील त्र्यंबके यांच्यासह दोन जणांवर रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ok

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles