Saturday, October 5, 2024

नगर शहरासाठी लवकरच ४० इलेक्ट्रिक बसेस ,खासदार नीलेश लंके

नगर शहरासाठी लवकरच ४० इलेक्ट्रिक बसेस

खासदार नीलेश लंके यांची माहिती

नगर : प्रतिनिधी

पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत नगर शहरासाठी ४० इलेक्ट्रिकल बसला मंजुरी देण्यात आली असून लवकरच या बसेस नगर महानगर पालीकेच्या सेवेत रूजू होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. या उपक्रमामुळे सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात एका नव्या युगाचे पाऊल पडणार असल्याचे लंके म्हणाले.
महानगरपालिकेचे अधिकारी तसेच केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसमवेत या प्रकल्पासाठी अनेक बैठका होऊन त्यात सकारात्मक चर्चा झाल्या होत्या. त्याचाच परिपाक म्हणून या ४० बसेस मंजुर करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक परिवहन सुधारण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे नमुद करून खा. लंके म्हणाले, या उपक्रमामुळे शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील प्रवाशांना सोईस्कर आणि पर्यावरणपुरक वाहतूक उपलब्ध होणार आहे. प्रदुशन होणार नसल्याने वायु गुणवत्तेत सुधारणा होईल तसेच वाहतूकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, ग्रामीण भागातील प्रवासी या बस सेवेचा लाभ घेऊ शकतील. त्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रालाही त्याचा फायदा होणार आहे.
ही बस सेवा लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असून जेणे करून प्रत्येक नागरीक, विद्यार्थी, शेतकरी त्याचा लाभ घेउ शकेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तसेच परिवहन समितीशी चर्चा करण्यात येणार असल्याचे खा. लंके म्हणाले.

सुरक्षितता आणि प्रवेश योग्यता

या बसमध्ये सरक्षितता आणि प्रवेश योग्यतेच्या विशेष सुविधा देखील असतील, जेणेकरून वृध्द आणि अपंग व्यक्तींना सोईची वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. स्थानिक नागरीकांच्या फिडबॅकसाठी विशेष मंचची देखील स्थापना करण्यात येईल, ज्यामुळे आमचे काम अधिक पारदर्शक असेल.

खा. नीलेश लंके

शहर व केडगांवमध्ये चार्जिंग स्टेशन

नऊ मिटर लांबीच्या या बसेसच्या चार्जींगसाठी नगर शहर व केडगांवमध्ये चार्जिंग स्टेशनची निर्मिती करण्यात येत असून पार्कींग डेपोही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

२५ किमी पर्यंत बस सेवा सुरू करण्याचा विचार

नगर शहरातील नागरीकांना बसेसची सुविधा देताना शहरातील नागरीकांसाठी तसेच नगर शहरात येणाऱ्या नागरीकांसाठी शहरापासून सुमारे २५ किलोमिटर अंतरावरील महामार्गांवर ही बस सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे. ज्यामुळे महापालीकेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे खा. लंके म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles