Monday, September 16, 2024

पारनेर, नेवासा परिसरात अवैध दारु व जुगार अड्ड्यावर छापा, 5 आरोपी ताब्यात…

पारनेर व नेवासा परिसरातील अवैध दारु व जुगार अशा 5 ठिकाणी छापे टाकुन 32,310/- रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त, 5 आरोपी ताब्यात.
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन खालील प्रमाणे कारवाई केलेली आहे.
नमुद आदेशान्वये स्थागुशा पथकाने दिनांक 05/08/24 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व नेवासा परिसरात सुरु असलेल्या अवैध देशी, विदेशी दारु तसेच कल्याण मटका जुगार अशा 5 ठिकाणी छापे टाकुन एकुण 32,310/- रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केला असुन 5 आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी व महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये एकुण 5 गुन्हे दाखल केले आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गुरनं व कलम आरोपीचे नांव जप्त मुद्येमाल
1. पारनेर गु.र.नं. 568/24 मदाकाक 65 (ई) 1) सुरज हरिश वरखडे वय 18, रा. निघोज, ता. पारनेर (हॉटेल साहिल) 25,110/- विविध प्रकारची देशी व विदेशी दारु
2. पारनेर गु.र.नं. 569/24 मदाकाक 65 (ई) 1) ज्ञानेश्वर जबाजी कवाद वय 38, रा. निघोज, ता. पारनेर (हॉटेल ग्रीनपार्क) 3,650/- विविध प्रकारची देशी व विदेशी दारु
3. नेवासा गु.र.नं. 743/24 मजुकाक. 12 (अ) 1) प्रमोद भाऊसाहेब मेथे वय 50, रा. मोहिनीराज मंदीरा शेजारी, नेवासा 1,150/- रुपये रोख रक्कम व जुगाराची साधने
4. नेवासा गु.र.नं. 744/24 मजुकाक. 12 (अ) 1) संतोष लक्ष्मण कणगरे वय 30, रा. नेवासा बुा, ता. नेवासा 1,350/- रुपये रोख रक्कम व जुगाराची साधने
5. नेवासा गु.र.नं. 747/24 मजुकाक. 12 (अ) 1) सुरेश रामदास बोरुडे वय 62, रा. मुकींदापुर, ता. नेवासा 1,050/- रुपये रोख रक्कम व जुगाराची साधने
एकुण
5 पुरुष
32,310/- रुपये रोख रक्कम व जुगाराची साधने तसेच विविध प्रकारची देशी व विदेशी दारु
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण व मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles