माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील १५ गावांना १६ पुरस्कार राज्यात अहमदनगर जिल्हा परिषदेचा डंका
७ कोटी ६५ लाखाची बक्षिसे जाहीर राज्यात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल मा.आशिष येरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना द्वितीय पारितोषिक जाहीर
अहमदनगर:- माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना ७ कोटी ६५ लाख रुपयाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यासह राज्यात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा व नाशिक विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे ग्रामीण भागात उत्कृष्ट कामकाज केले असून, यामुळे राज्याच्या यादीत अहमदनगर जिल्ह्याला मोठी संधी मिळाली आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, नोडल अधिकारी समर्थ शेवाळे, जिल्हा समन्वयक रविंद्र ठाणगे यांच्यासह ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर संबंधित गावचे सरपंच यांनी मोठे योगदान दिले आहे. अहमदनगर जिल्ह्यात अभियान यशस्वी झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये
१) 10 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या गट राज्यस्तर द्वितीय क्रमांक घुलेवाडी 1 कोटी 50 लाख
२) भुमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी घुलेवाडी ता.संगमनेर 75.00 लाख
३) 10 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या गट राज्यस्तर उत्तेजेनार्थ प्रथम क्रमांक मिरजगांव ता.कर्जत 75.00 लाख
४) 10 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या गट राज्यस्तर उत्तेजेनार्थ तृतीय क्रमांक संवत्सर ता. कोपरगांव 75.00 लाख
५) 10 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या गट नाशिक विभागस्तर प्रथम क्रमांक लोणी बु. ता.राहता 50.00 लाख
६) 10 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या गट नाशिक विभागस्तर तृतीय क्रमांक गुंजाळवाडी 15.00
७) 5 हजार ते 10 हजार लोकसंख्या गट विभागस्तर द्वितीय क्रमांक धांदरफळ बु. 15.00 लाख्
८) 2.5 हजार ते 5 हजार लोकसंख्या गट राज्यस्तर उत्तेजेनार्थ प्रथम क्रमांक वाघाली ता.शेवगांव 50.00 लाख
९) 2.5 हजार ते 5 हजार लोकसंख्या गट राज्यस्तर उत्तेजेनार्थ तृतीय क्रमांक खांडगांव ता.संगमनेर 50.00 लाख
१०) 2.5 हजार ते 5 हजार लोकसंख्या गट राज्यस्तर नाशिक विभाग प्रथम क्रमांक आव्हाणे बु. 50.00 लाख
११) 2.5 हजार ते 5 हजार लोकसंख्या गट राज्यस्तर नाशिक विभाग द्वितीय क्रमांक पेमगिरी ता.संगमनेर 15.00 लाख
१२) 2.5 हजार ते 5 हजार लोकसंख्या गट राज्यस्तर नाशिक विभाग तृतीय क्रमांक चिचोली गुरव ता.संगमनेर 15.00 लाख
१३) 1.5 हजार ते 2.5 हजार लोकसंख्या गट नाशिक विभागस्तर तृतीय क्रमांक लोहारे ता.संगमनेर 15.00 लाख
१४) 1.5 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गट राज्यस्तर तृतीय क्रमांक तिगांव ता.संगमनेर 50.00 लाख
१५) 1.5 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गट नाशिक विभागस्तर प्रथम क्रमांक जाफराबाद ता.श्रीरामपुर 50.00 लाख
१6) 1.5 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गट नाशिक विभागस्तर तृतीय क्रमांक चौरकौठे ता.संगमनेर 15.00 लाख
बक्षिसाची रक्कम गाव विकासासाठी
ग्रामपंचायतींना मिळालेल्या बक्षिसाच्या या रकमेंपैकी ५० टक्के रक्कम हरित क्षेत्र वाढवण्यासाठी, उर्वरित ४० टक्के रक्कम पर्यावरण पूरक उपायोजनांसाठी v १० टक्के रक्कम माझी वसुंधरा अभियान ५.० मधील घेतलेल्या स्पर्धेच्या बक्षीसांसाठी वापरण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीस मिळाल्याने जिल्ह्याचा राज्यात नावलौकिक वाढला आहे.
पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी भुमी,वायू,अग्नी, जल व आकाश या घटकात शासनाच्या मागदर्शक निर्देशानुसार उपययोजना करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीमध्ये या विषयी विविध उपक्रम राबवून नागरिकांना सहभागी करुन घेण्यात आले.
भुमी :- या घटाकात ग्रामपंचायतींनी देशी प्रजातीची झाडांची लागवड केली. मागील चार वर्षापासून लावलेल्या झाडांचे संगोपन करुन त्यांना जगवले. रोपवाटीका तयार केल्या. हिरत व सुदर दिसण्यासाठी हरित क्षेत्रे तयार केली. कचऱ्याचे संकलन करुन त्यावर प्रक्रिया करण्यात आली. सिंगल युज प्लास्टिक वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली. हागणदारीमुक्त करुन स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओ.डी.एफ प्लसचा दर्जा कायम ठेऊन मॉडेल गावे तयार केली.
वायु:- या घटकात ग्रामपंचायतींनी अभियान कालावधी हवेची गुणवत्ता तपासणी त्यावर उपाययोजना केल्या. सण उत्सवात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालून वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्यात आली. नागरिकांना गावात सायकल चालविण्यासाठी सायकल ट्रॅक तयार केला. वायू प्रदुषण कमी होण्यासाठी नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने वापरासाठी प्रोत्साहित करुन जन जागृती करण्यात आली. गावात चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले.
जल:- या घटकात ग्रामपंचायतींनी पाणी पातळी वाढण्यासाठी उपाययोजना केल्या. गावातील पाणी साठयांची साफसफाई केली. गावातील नदी,ओढे पात्रात स्वच्छता करण्यात आली. सार्वजनिक इमारतीचे वॉटर ऑडिट करण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. पर्यावरण पुरक सण व उत्सव साजरे करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. गणपती विसर्जन दरम्यान जल प्रदुष्ण टाळण्यासाठी गावात कृत्रिम जलकुंड तयार केले. इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहीत केले.
अग्नी:- या घटकांत ग्रामपंचायत हद्दीत एलईडी स्ट्रीट लाईट लावण्याचे काम केले. गावात विविध ठिकाणी सोलर लाईट लावली. गावातील नागरिकांच्या पक्क्या घरावर सोलर बसविण्यासाठी व शेतीसाठी सोलर बसविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. गावातील सार्वजनिक इमारतींचे एनर्जी ऑडिट करुन त्यावर उपाययोजना केल्या. ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त एल.ई.डी लाईट वापरणेबाबत जनजागृती केली.
आकाश:- या घटकात ग्रामपंचायतीमधील नागरीकांमध्ये माझी वसुंधरा अभियानाची जास्ती जास्त प्रमाणात प्रचार व प्रसार होण्यासाठी माहिती शिक्षण व संवाद आराखडा तयार करण्यात आला होता. अभियानाची माहिती पोहचण्यासाठी स्पर्धा,कार्यक्रम आयोजन करुन जनजागृती केली. गावात अभियानाची जनजागृती व्हावी म्हणून नागरिकांना व विदयार्थ्यांना हरित शपथ घेण्यासाठी प्रोत्साहित केले व शपथ घेतली. गावातील पर्यावरण प्रेमी व पर्यावरण दूत म्हणून निवड करुन विविध कार्यक्रमाद्वारे व त्याच्या सहभागाने गावात जनजागृती करत अभियानाचे उदिष्टे पुर्ण केली. तसेच अभियानाची जनजागृती करण्यासाठी ग्रामपचायत हद्दीत अभियानाची पंचतत्वे दर्शवणारे चित्रे काढून अभियानाची प्रभावी जनजागृती करण्यात आली होती.