राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरूवात केलीये. तसेच याबाब मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कोरोनाची लागण झाल्यास त्या व्यक्तीला ५ दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
याबाबत टास्क फोर्समार्फत लकरच नियमावली देखील जाहीर केली जाणार आहे. राज्यात सध्या ८६२ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या दहा दिवसांत ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढलीये. त्यामुळे कोरोना झाल्यास आधी गृहविलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्यात. वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. तसेच अशा व्यक्तींना कुटुंबातील कोरोना झालेल्या व्यक्तींपासून दूर ठेवावे असे सांगण्यात आलेय.
टास्क फोर्सचा मोठा निर्णय….कोरोना पॉझिटीव्ह असल्यास 5 दिवस गृहविलगीकरण
- Advertisement -