Wednesday, April 17, 2024

अहमदनगर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक सादर,विविध नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद

अहमदनगर जिल्हा परिषदेचे सन 2024-25 आर्थिक वर्षाचे 50 कोटी अंदाजपत्रक सादर

नगर : अहमदनगर जिल्हा परिषदेचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे 50 कोटी 1 लाख 95 हजार 149 रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अंदाजपत्रक जाहीर केले. यात जिल्हा परिषद शाळेत ओपन सायन्स पार्क उभारणी, मिशन आरंभ, सुरभि सुरक्षा अभियानासह एकुलती एक, लाडाची लेक, जलधारा अशा नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, समर्थ शेवाळे, राजू लाकूडझोडे, दादाभाऊ गुंजाळ, भास्कर पाटील, श्रीरंग गडधे, शरद दिघे, पांडुरंग गायसमुद्रे, संजय आगलावे, भगवान निकम, योगेश आंबरे, महेश कावरे आदी उपस्थित होते.

अंदाजपत्रकात जिल्हा परिषद शाळांमध्ये ओपल सायन्स पार्क विकसित करण्यासाठी 50 लाख रुपये, मिशन स्पार्क अंतर्गत थुंबा केरळ येथे विक्रम साराभाई स्पेस सेंटर, इसरो, आयआयएस, डीआरडीओ अशा संशोधन संस्थांमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहली आयोजित करण्यासाठी 25 लाख रुपये, मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 3 री, 4 थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारी पुस्तिका छापणे, इयत्ता 4 थी व 7 वी सराव परीक्षा घेणे तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करणे व ऑनलाईन तासिकांसाठी 6 लाख रुपये, मधाचे गाव विकसित करण्यासाठी 10 लाख रुपये, सुरभि सुरक्षा अभियानांतर्गत गायी म्हशीच्या पोटातील लोहजन्स वस्तूंपासून प्रतिबंध व उपायांकरिता साहित्य व उपकरणे पुरवणेसाठी 10 लाख, वाचन प्रेरणा उपक्रमांतर्गत गंथालयात पुस्तके, मासिक, दैनिक खरेदीसाठी 1 लाख रुपये, क्युआर कोड अटेंडन्स सिस्टीमसाठी 6 लाख रुपये, मिशन पंचसूत्री पुरस्कार, जिल्हा स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 7 लाख, 5 लाख आणि 3 लाख रुपयांचा पुरस्कार देणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात हर्बल, आयुष गार्डन विकसित करण्यासाठी 5 लाख रुपये, एकुलती एक, लाडाची लेक या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत एक मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यास प्रत्येकी 20 हजार रुपये प्रोत्साहन देण्यासाठी 5 लाख्चा रुपये, ग्रामीण भागात रस्ते व दळणवळण सुविधेसाठी 4 कोटी 60 लाख रुपये, जलधारा जलसंधारण कामांची देखभाल दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपये, जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या जागा जाहिरातीकरिता भाडेतत्वावर देत सुमारे 10 लाखांचे उत्पन्न मिळवणे आदी तरतूदी अंदाजपत्रकात करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles