सोयीच्या ठिकाणीच नोकरी करता यावी, बदली होवू नये म्हणून दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या बीड जिल्ह्यातील ५२ शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या या धडक कारवाईने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सीईओ अजित पवारांनी केलेल्या चौकशीत जिल्ह्यातील २४८ पैकी ५२ शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र खोटे असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पवारांनी या ५२ शिक्षकांना निलंबित करत झटका दिला आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकांची विभागीय चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.