नगर-बिगिन दि बिगिन ही धून पावणे बारा वाजता वाजवण्यात आली नंतर नगर सेंटरने च्या सदस्यांनी मेहेरधून म्हटली. दु १२ वा मौनास सुरुवात झाली यावेळी सर्वत्र शांतता होती टाचणी पडली तरी समजेल इतकी शांत वातावरण होते १५ मिनिटानंतर अवतार मेहेर बाबा कि जय च्या जयघोषात मौन सोडण्यात आले.यावेळी टेकडीवर ६० हजाराच्या वर भाविक होते
अवतार मेहेरबाबाच्या समाधी स्थळी ५५ वी अमर तिथी सोहळात आज ३१ जानेला बाबांनी देहत्याग केला त्यावेळेस दु १२ वा दौंड रोडवरील मेहराबाद(अरणगाव)येथे सुमारे ६० हजार भाविकाचे मौन पाळले तर जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळले
कालपासून सुरु झालेल्या अमरतिथीसाठी हजारो भाविक बसतील असा भव्य मंडप आहे.त्याव्यतिरिक्त जेथे मिळेल भाविक बसून होते अवतार मेहेरबाबांनी मौनास सुरवात केल्यावर शेवटपर्यंत मौन पाळले म्हणून आज हे महामौन पाळले जाते
सकाळी भजनास सुरवात झाली नंतर मेहेरधून म्हटली गेली नंतर मुख्य मंडपात कार्यक्रम सुरु झाले आजहि समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या होत्या.भारतातून सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी आले आहेत कोठेहि गडबड,गोंधळ नव्हता सांस्कृतिक कार्यक्रम दिवसभर चालू होता त्यातमेहेर प्रेमीनी भजने,गजल,नृत्ये,कव्वाली,गाणे ,नाटिका सादर केल्या
अहमदनगर मेहेरबाबाच्या समाधी स्थळी 60 हजार मेहेरप्रेमींनी पाळले मौन
- Advertisement -