Saturday, October 5, 2024

२०२३ च्या खरीप हंगामातील पीक विमा, नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा खात्यात ७१३ कोटी होणार जमा!

२०२३ च्या खरीप हंगामातील
उर्वरित पीक विमा नाशिकसह ६ जिल्ह्यांतील
शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा

– कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. :- ‘सर्वसमावेशक पीक योजने’अंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाने पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे नाशिक, जळगावसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई १९२७ कोटी रुपये लवकरच मिळतील, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

पीक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते. म्हणजेच ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या ११०% पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी ११०% पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते.

या तत्त्वानुसार खरीप हंगाम २०२३ मधील मंजूर ७,६२१/- कोटी रुपये पैकी विमा कंपनी मार्फत ५४६९/- कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आले आहे.
तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी १९२७ कोटी रुपये ची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती. ही मंजूर रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून याबाबत ३० सप्टेंबर २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

ही रक्कम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी दिली. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.

या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ –
नाशिक रु.६५६/- कोटी,
जळगाव ₹४७०/- कोटी,
अहमदनगर ₹ ७१३/- कोटी,
सोलापूर ₹२.६६ कोटी
सातारा ₹२७.७३ कोटी व
चंद्रपूर ₹ ५८.९० कोटी.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles