7th Pay Commission केंद्रीय कर्मचाऱ्यांवरही लवकरच आनंदाच्या सरी बसरणार आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार आहे. जुलैचा महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मे २०२४ AICPI निर्देशांकाचे आकडे अपडेट झाले असून यानुसार आता महागाई भत्ता ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. अशा स्थितीत, आता फक्त जूनचे AICPI आकडे जाहीर होणे बाकी आहे, जे ३१ जुलै रोजी प्रसिद्ध होतील.जानेवारीपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता दिला जात आहे जो मार्च २०२४ मध्ये वाढवण्यात आला होता.जुलैमध्ये डीएमध्ये ३% वाढीची शक्यता असून असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण ५३ टक्के महागाई भत्ता मिळेल.