केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. जुलै 2024 पासून लाहू होणाऱ्या महागाई भत्त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. AICPI (ऑल इंडिया कन्झ्यूमर प्राईस इंडिया) चे जून 2024 चे आकडे जारी करण्यात आले आहेत. या आकडेवारीनंतर आता सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना लाभ होणार असल्याचे म्हटले जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात AICPI इंडेक्स 138.9 अंकांवर होता. त्यामुळे महागाई भत्ता वाढून 50.84 टक्क्यांवर पोहोचला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणार असली तरी त्याला जुलै 2024 पासूनच लागू केले जाईल. जुलै, ऑगस्ट या महिन्यांचा महागाई भत्ता एरियरच्या रुपात दिला जाईल.
7th Pay Commission…कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होणार
- Advertisement -