7th pay commission केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलै २०२४ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची (डीए वाढ) तारीख निश्चित झाली असून आता सप्टेंबरच्या अखेरीस याबाबत घोषणा होणार आहे. या महिन्यात सरकार महागाई भत्त्यात वाढ जाहीर करेल ज्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि त्यानंतर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातही घसघशीत वाढ होईल.
सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA वाढीचा थेट लाभ मिळतो. जानेवारी २०२४ पासून महागाई भत्ता ५०% पर्यंत वाढला तर जून महिन्यात AICPI निर्देशांकात १.५ अंकांची मोठी वाढ झाली ज्यामुळे महागाई भत्त्याची संख्याही वाढली आहे. जानेवारी ते जून २०२४ दरम्यान आलेल्या AICPI-IW निर्देशांकाच्या आकड्यांवरून जुलैपासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ३% वाढ होताना दिसत आहे.