Wednesday, April 17, 2024

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात होणार घसघशीत वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मंजूर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल. कर्मचाऱ्यांच्या पुढील पगार ही वाढ जमा केली जाणार आहे. यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे. सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने सरकारी तिजोरीवर १२,८६८.७२ रुपयांचा बोजा वाढणार आहे.७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, या वाढीसह केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या टेक-होम पगाराच्या पॅकेजमध्ये वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार एचआरए वाढीसाठी शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीची माहिती देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, या निर्णयामुळे सरकारवर १२,८६९ कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे. पीयूष गोयल म्हणाले की, या निर्णयामुळे एचआरएही वाढणार आहे. याशिवाय ग्रॅच्युइटीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. ग्रॅच्युइटीची मर्यादा २० लाखांवरून २५ लाख रुपये करण्यात आली आहे. पीयूष गोयल म्हणाले, या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये अनेक मोठे फायदे मिळतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles