Saturday, March 22, 2025

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला ८ कोटी ३४ लाखांचा ढोबळ नफा

सभासदांना यावर्षी १ टक्का ज्यादा लाभांश वाटणार – चेअरमन योगेंद्र पालवे
नगर – अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात ८ कोटी ३४ लाख ढोबळ नफा झालेला असून त्यातून ४ कोटी ५३ लाख रुपये आवश्यक त्या तरतुदी करून संस्थेस ३ कोटी ८१ लाख निव्वळ नफा झालेला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन योगेंद्र पालवे व व्हाईस चेअरमन दिलीप डांगे यांनी दिली. तसेच या वर्षी सभासदांना १ टक्का ज्यादा म्हणजे १२ टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना चेअरमन योगेंद्र पालवे यांनी सांगितले की, संस्थे मार्फत सभासदांना १७ लाख कर्ज मंजूर केले जाते. सभासदांच्या मुदत ठेवीवर ८ टक्के व्याजदर दिलेला आहे. संजय कडूस यांच्या नेतृत्वाखालील जय श्री गणेश पॅनलने संस्थेचा कारभार हाती घेतल्या पासून संचालकांनी खर्चात काटकसर करून आणि आवश्यक त्या तरतुदी करून सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याबरोबरच सभासदांच्या कायम ठेवीवर ९ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या मासिक सभेमध्ये दि. ९ जून २०२४ ला वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे ठरले आहे.
मार्च २०२४ अखेर संस्थेची सभासद संख्या २६११ असून संस्थेचे वसूल भाग भांडवल २४.६७ कोटी, फंड्स १७.७३ कोटी, ठेवी १५९.५५ कोटी, सभासदांना कर्ज वाटप १५४ कोटी असून अहवाल सालात सभासद कल्याण निधी मधून विवाहभेट योजेने अंतर्गत ४२ सभासदांचे मुला मुलींचे विवाहासाठी संस्थे मार्फत धनादेशव्दारे प्रत्येकी ५ हजार रुपये योजनेचे लाभ दिलेला आहे.
तसेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या सभासद कुटूंब आधार विमा योजने अंतर्गत ५ मयत सभासदांचे कायदेशीर वारसास रुपये १५ लाख प्रमाणे सभासद कुटूंब आधार विमा योजनेचा लाभ देण्यात आला असून बाकी रक्कमेची गुंतवणूक संस्थेच्या मुदतठेव खाती केली असून भविष्यात ठेवीवरील मिळणा-या व्याजावर सदर योजना चालणार आहे. संस्थेच्या सभासदांसाठी सन २०२४-२०२५ या साला करीता वार्षिक १० लाखाची अपघात विमा पॉलीसी घेतलेली आहे. या अहवाल सालामध्ये अपघात विम्या मधून सभासदाच्या वारसास १० लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. मागील वर्षाप्रमाणे सभासदांचे लाभांश व व्याजाची रक्कम सभेच्या दुसऱ्या दिवशी सभासदांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याचे व्हा.चेअरमन दिलीप डांगे यांनी सांगितले.
संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष गुणवत्ता प्राप्त सभासदांच्या मुला-मुलीना पारितोषिक वितरण, सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली. सदर प्रसंगी संस्थेचे संचालक संजय कडूस, प्रशांत मोरे, विक्रम ससे, विलास शेळके, अरुण जोर्वेकर, भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, श्रीमती ज्योती पवार, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, अर्जुन मंडलिक, श्रीमती सुरेखा महारनूर, श्रीमती मनिषा साळवे, दिपक गोधडे, नितीन चोथवे, व्यवस्थापक राजेंद्र पवार,उप व्यवस्थापक प्रशांत लोखंडे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles