Tuesday, September 17, 2024

प्राथमिक शिक्षक बँकेला 8 कोटी 63 लाखांचा निव्वळ नफा, रविवारी बँकेची सर्वसाधारण सभा

शिक्षक बँकेला 8 कोटी 63 लाखांचा निव्वळ नफा

रविवारी शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा

शिक्षक बँकेला 8 कोटी 63 लाखांचा निव्वळ नफा

सात टक्के लाभांशाची शिफारस-बाळासाहेब सरोदे.

अहमदनगर- अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 105 वी सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी 11 वा. सुखकर्ता लॉन्स, कल्याण रोड, येथे होत आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात शिक्षक बँकेला 8 कोटी 63 लाखांचा नफा झाला असून सभासदांना सात टक्के प्रमाणे लाभांश देण्याची शिफारस सर्वसाधारण सभेसमोर ठेवली आहे. शिक्षक बँकेच्या आज रोजी 1500 कोटीच्या दरम्यान ठेवी असून 1100 कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. गेल्या आठ वर्षापासून सभासद हिताचा बँकेत कारभार सुरू असून, तो यापुढे सुरू राहील, अशी ग्वाही शिक्षक बँकेचे चेअरमन श्री बाळासाहेब सरोदे यांनी दिली.
शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभे निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिक्षक नेते सुरेश निवडुंगे, राजकुमार साळवे, साहेबराव अनाप, विद्याताई आढाव, अर्जुन शिरसाठ, बाबा खरात, आर.टी. साबळे, राजू राहणे, किसन खेमनर, बाळासाहेब मुखेकर, राम वाकचौरे आदी नेते उपस्थित होते.
यावेळी शिक्षक बँकेचे व्हा . चेअरमन रमेश गोरे यांनी सभासद कल्याण निधी मधून सभासदांच्या पाल्यांना पारितोषिके व आजारी सभासदांना पंचवीस हजार रुपये पर्यंत वैद्यकीय मदत केली असून, सभासदांचा वाढलेला मृत्युदर व वाढलेली कर्ज मर्यादा यामुळे सभासदांचा कर्ज निवारण निधी सध्या शिल्लक नाही. हा निधी वाढवण्यासाठी विनापरतावा एक हजार रुपये ठेव घेण्याचा व कुटुंब आधार मधील पावणेदोन कोटींची रक्कम या निधीत वर्ग करण्याचा पोटनियम दुरुस्तीसाठी ठेवला असून, नगर व जामखेड कार्यालयासाठी स्वमालकीची जागा घेणे बाबत शिफारस मंजुरीसाठी ठेवली आहे. जिल्ह्यातील मंडळाच्या व संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा करून सर्व सभासदांच्या बहुमतानेच सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केले जातील, सर्व सभासदांना बोलण्याची संधी दिली जाईल, असे आश्वासित केले.
यावेळी संचालक सर्वश्री कैलास सारोक्ते, अण्णासाहेब आभाळे ,भाऊराव राहिंज,शशिकांत जेजुरकर, योगेश वाघमारे, माणिक कदम, सूर्यकांत काळे, संतोषकुमार राऊत, ज्ञानेश्वर शिरसाठ, शिवाजी कराड, दिनेश खोसे, विठ्ठल फुंदे, सुनील गायकवाड, अरविंद शिर्के,अशोक गुरव, सुनील मते, उषा येणारे मॅडम,वसंत कर्डिले आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles