अहिल्यानगर : जिल्यातील ८ पराभूत उमेदवारांच्या उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल. इव्हीएम पडताळणीसाठी केलेले अर्ज मागे घेतले पण विजयी उमेदवारांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. बाळासाहेब थोरात, राम शिंदे, अभिषेक कळमकर, प्रताप ढाकणे, प्राजक्त तनपुरे, अमित भांगरे, राणी लंके व संदीप वर्पे यांनी केल्या याचिका दाखल.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या जिल्ह्यातील आठ उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. विजयी उमेदवारांच्या निवडीस आव्हान देत या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक याचिका दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता.
बाळासाहेब थोरात (संगमनेर) यांनी अमोल खताळ यांच्या विरोधात याचिका केली.
राम शिंदे (कर्जत) यांनी रोहित पवार यांच्या विरोधात याचिका केली.
अभिषेक कळमकर (अहमदनगर) यांनी संग्राम जगताप यांच्या विरोधात याचिका केली.
प्रताप ढाकणे (शेवगाव) यांनी मोनिका राजळे यांच्या विरोधात याचिका केली.
प्राजक्त तनपुरे (राहुरी) यांनी शिवाजी कर्डीले यांच्या विरोधात याचिका दाखल केली.
अमित भांगरे (अकोले) यांनी किरण लहामटे यांच्यावर
राणी लंके (पारनेर) यांनी काशिनाथ दाते यांच्यावर
संदीप वर्पे (कोपरगाव) यांनी आशुतोष काळे यांच्यावर याचिका दाखल केली आहे.
या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून काय निर्णय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीशी संबंधित या याचिकांवर न्यायालयाचा निकाल काय राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.