Sunday, July 21, 2024

नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघासाठी 93.48 टक्के मतदान, तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी काल (बुधवारी) मतदान पार पडले. नाशिक विभागात सायंकाळी सहा वाजेपर्यंत 93.48 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी मतदानासाठी सायंकाळी सहानंतरही रांगा असल्याने मतदानाच्या आकडेवारीत वाढ होणार आहे. नगर जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सायंकाळी सहापर्यंत 93.88 टक्के मतदान झाले. एकूण 17 हजार 392 मतदारांपैकी 16 हजार 327 मतदारांनी मतदान केले. नेवासा येथील मतदान केंद्रावर सहानंतरही रांगा असल्याने मतदानाच्या आकडेवारीत वाढ होणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 21 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी नगर जिल्ह्यातील 9 उमेदवार होते. मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत होती. जिल्ह्यातील 20 मतदान केंद्रांवर किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले, मात्र काही ठिकाणी शिक्षक मतदारांना पावसात भिजत मतदान करावे लागले. सकाळी 11 पर्यंत मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी होती.

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे अकोले (96.13), संगमनेरमधील तीन केंद्रांवर अनुक्रमे (97.55), (97.43) व (91.18), राहत्यातील दोन केंद्रांवर (95.33) व (92.26), कोपरगावमधील दोन केंद्रावर (95.47) व (91.53), श्रीरामपूर (95.43), नेवासा (92.42), शेवगाव (92.24), पाथर्डी (93.82), राहुरी (92.46), पारनेर (95.83), नगर ग्रामीणमधील दोन केंद्रावर अनुक्रमे (94.30) व (90.02), नगर शहर (91.30), श्रीगोंदा (92.55) कर्जत (96.85) व जामखेड (95.82) टक्के.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles