अजितदादांना स्वतः पंतप्रधान मोदींनी भाषणासाठी विनंती केली होती, भाजपचा खुलासा

0
849

देहू येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी भाजपवर टीका करत आहेत. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपने म्हटलंय,

देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खाजगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही.
शिवाय स्वत: पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची विनंती केली. पण, त्यांनी नकार दिला.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यातील एकच कार्यक्रम सरकारी होता, तो राजभवन येथील. तेथे प्रोटोकॉलपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. (येथे श्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालेले नाही, हे लक्षात घ्या)
मुंबई समाचारचा कार्यक्रम खाजगी होता. तरीही तेथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले, श्री देवेंद्र फडणवीस यांचे नाही.
मा. नरेंद्र मोदीजी यांच्या तीन कार्यक्रमांपैकी दोन कार्यक्रमात श्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण न होऊनही भाजपाकडून कोणताही आक्रस्ताळेपणा झालेला नाही. कारण, भाजपासाठी वारकरी, स्वातंत्र्यसेनानींचे स्मारक, एका वृत्तपत्राची द्विशताब्दी हे विषय महत्त्वाचे आहेत, स्वत:चा अहंकार नाही.
ही वस्तुस्थिती कळल्यानंतर सुद्धा ज्यांना केवळ गरळ ओकायची आहे, त्यांना महाराष्ट्राचा गौरव, महाराष्ट्राची परंपरा याच्याशी काहीएक घेणं-देणं नाही. त्यांना केवळ तळ्या उचलायच्या आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गरळ ओकण्यामागे मोदीद्वेष अधिक आहे. त्यामुळे त्यांना औषध नाही.