Home राजकारण महाविकास आघाडीला गळती? प्रमुख साथीदार साथ सोडण्याच्या तयारीत

महाविकास आघाडीला गळती? प्रमुख साथीदार साथ सोडण्याच्या तयारीत

0
2866

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी शुक्रवारी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना तसे संकेत दिले. महाविकास आघाडीने आमची सर्व पातळ्यांवर निराशा केली आहे. त्यामुळे मविआ सरकारमधून बाहेर पडण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या ५ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत कठोर निर्णय घेतला जाईल, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी तयार झाली, त्याचं काय झालं? अनेक मुद्दे खटकणारे आहेत. नवीन धोरण राबवताना संवादही साधला नाही. या सगळ्या गोष्टींची समीक्षा येत्या ५ एप्रिलला करणार आहोत. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.