Viral Video सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, भरे विकणारा किती आश्चर्यकारकरित्या भजे तळताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ रायपूर बस स्टँड परिसरातला असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हिडीओमध्ये एका कढईत भजे तयार होत असल्याचे दिसत आहे.
पण भजे विकणारा हा व्यक्ती कढईतून तळलेले भजे काढण्यासाठी इतर कोणत्याही वस्तूचा वापर करण्याऐवजी चक्क हाताचा वापर करतो. उकळत्या तेलात हा व्यक्ती आपला हात घालून गरम गरम भजे बाहेर काढताना दिसून येतो. धक्कादायक म्हणजे या कामात त्याच्या चेहऱ्यावर किंचितही भीती दिसून आली नाही. ती व्यक्ती बेधडकपणे उकळत्या तेलात हात घालून भजे बाहेर काढते आणि कागदावर ठेवते.
Pushpa…’सामी सामी’ गाण्यावर आजीबाईंचा धमाल डान्स… व्हिडिओ