जिल्हा प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाची जिल्हा बैठक बुधवारी पार पडली. यात अनेक खलबते होत, विविध विषयांवर ठराव झाले. त्यापैकी स्वराज्य मंडळ कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध असून येत्या निवडणुकीत शिक्षक बँकेच्या व विकास मंडळाच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याचा ठराव करण्यात आला. दरम्यान, रोहकले गटाचे बाबुराव कदम यांनी स्वराज्य मंडळात प्रवेश केला आहे.
कदम यांनी स्वराज्य मंडळात प्रवेश करताच स्वराज्य मंडळाची ताकद वाढली आहे. आता स्वराज्य मंडळाच्या उच्चाधिकार समिती जिल्हाध्यक्षपदी कदम यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष विनोद देशमुख, श्रीरामपूरचे निलेश राजवाळ, अकोल्याचे जिल्हा नेते प्रशांत गवारी, संगमनेरचे कार्याध्यक्ष अशोक साळवे व संगमनेर विश्वस्त गणेश शेंगाळ, कर्जतचे जिल्हा नेते संतोष हजारे, दीपक बडे, अमोल साळवे, स्वराज्याचे नेते ज्ञानेश्वर सोनवणे व सय्यद तौसिफ यांनी मनोगते व्यक्त करत स्वराज्याला पुढील दिशा देण्यासंदर्भातील मार्गदर्शन केले.
सभेचे प्रास्ताविक भाऊसाहेब पाचारणे यांनी केले. यावेळी प्रतिक नेटके, निलेश राजवाळ, अर्जुन तळपाडे, प्रशांत गवारी, अरुण पठाडे, देविदास फुंदे, भाऊसाहेब पाचारणे, सय्यद तौसिफ, गणेश शेंगाळ, भाऊसाहेब गिरमकर, नितीन भोईटे, ज्ञानेश्वर सोनवणे, राज कदम, अमोल साळवे, नाना गाढवे, विनोद देशमुख, गणपत चव्हाण, दीपक बडे, अशोक जाधव, सतीश पटारे, अरविंद थोरात, सचिन नाबगे, राजेंद्र ठोकळ, प्रवीण झावरे, अशोक साळवे, बाबुराव कदम, सदानंद चव्हाण आणि योगेश थोरात तालुका व जिल्हा पदाधिकारी सहित् उपस्थित होते.






