नगर तालुक्यातील नारायण डोह परिसरामध्ये सापडला 200 वर्षांपूर्वीचा हातबॉम्ब; चर्चांना उधाण
नगर तालुक्यातील नारायणगाव डोह या ठिकाणी बाळासाहेब फुंदे यांच्या घरासमोर जुन्या काळातील बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली आहे. या संदर्भातली माहिती ग्रामस्थांनी तात्काळ नगर पोलिसांना आणि लष्कराला दिली असून पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नगर जिल्हा हा लष्कराचं ठाण आहे. या ठिकाणी याआधीही अशाप्रकारच्या वस्तू आढळून आल्या आहेत. पूर्वी युद्धामध्ये किंवा सराव करताना जे काही दारू गोळे असायचे.हा त्यातीलच भाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता आढळलेला हातबॉम्ब सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा असण्याची शक्यता आहे. याआधाही चार वेळेला नारायण डोह या परिसरामध्ये हातबॉम्ब सापडले होते.
नारायण डोह परिसरामध्ये पाचमन वस्तीजवळ बाळासाहेब फुंदे यांच्या घरासमोर हातबॉम्ब सापडला असून साधारणता येथे वजन दोन ते तीन किलो असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी ग्रामस्थांनी ही माहिती तात्काळ नगर पोलिसांना आणि लष्कराला कळवली असून दुपारी हे पथक घटनास्थळी दाखल झाले.