Wednesday, February 28, 2024

अहमदनगर मध्ये वाढदिवसाच्या दिवशी दुर्दैवी घटना, रेल्वेच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

नगर – दौंड रेल्वे मार्गावर अकोळनेर (ता.नगर) गावच्या शिवारात रेल्वे गाडीच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.६) पहाटे घडली. देविदास भानुदास मेहेत्रे उर्फ बाबु (रा. जाधववाडी, अकोळनेर, ता.नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

मयत देविदास हा टँकर चालक होता, तो अविवाहित होता. त्याचा सोमवारी (दि.५) वाढदिवस होता. रात्री त्याने मित्रांसमवेत वाढदिवसही साजरा केला. त्यानंतर रात्री अकोळनेर शिवारात भारत पेट्रोलियम डेपोच्या जवळील रेल्वेलाईनचे कडेला तो गंभीर जखमी अवस्थेत मिळून आल्याने त्यास खाजगी अॅम्बुलन्स चालक अक्षय दशरथ पाचारणे (रा. केडगांव) याने पहाटे ४.४० च्या सुमारास नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचाराकरीता दाखल केले असता तो औषधोपचारापुर्वीच मयत झाल्याचे मेडीकल ऑफिसर डॉ. कोल्हे यांनी घोषित केले.

याबाबतची माहिती जिल्हा रुग्णालयातील दवाखाना डयूटीवर असलेले तोफखाना पोलिस ठाण्याचे स.फौ. जठार यांनी नगर तालुका पोलिसांना दिली. तालुका पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.काँ. लगड हे करीत आहेत.

मयत देविदास याच्यावर दुपारी अकोळनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, २ विवाहित बहिणी असा परिवार आहे. एका अवघ्या २६ वर्षाच्या तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशी रात्रीच असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles