२७ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील खोसपुरी शिवारात बुधवारी (दि. 20) दुपारी उघडकीस आली आहे. भगवान भाऊसाहेब हारेर (वय २७, रा. खोसपुरी ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खोसपुरी शिवारात विटभट्टीजवळ भगवान भाऊसाहेब हारेर याने झाडाला गळफास घेतला. बुधवारी दुपारी 12 वाजता सदरचा प्रकार लक्षात आला. भगवान याला त्याचा चुलत भाऊ अक्षय भारत हारेर यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याबाबतची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयातील मेडिकल ऑफिसर डॉ. खेडकर यांनी रूग्णालयात नेमणूकीस असलेले तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार जठार यांना दिली. सहायक फौजदार जठार यांनी एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. भगवान हारेर यांनी आत्महत्या का केली याचा तपास पोलीस अंमलदार थोरवे करीत आहेत.