अहमदनगर -श्रीगोंद्यात एका अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना जेरबंद करत न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. जगात सर्वत्र महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री सुरक्षा, सबलीकरण, समता, महिलांचे अधिकार, शिक्षण,उन्नती आणि समाजात बरोबरीचे स्थान या साठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना याच दिवशी श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात एका उमलत्या कळीवर वारंवार अत्याचार होत असल्याचा प्रकार पुढे आला आणि यासंदर्भात गुन्हा दाखल होत दोन नराधमांना अटक करण्यात आली. या घटनेने केवळ श्रीगोंदा तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहे.
संतोष रामभाऊ पवार, युवराज नंदू शेंडगे यांच्यावर पोक्सो, ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा सर्व तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे हे करत आहेत.