Tuesday, December 5, 2023

नगर शहरात घरावर ताबा प्रमाणात मोठा ट्विस्ट,चोर सोडून संन्यासाला फाशी !

कायदेशीर बाबी पूर्ण करून घर खरेदी करूनही खोटा गुन्हा दाखल झाल्याचा पत्रकार परिषदेमध्ये आरोप.
गुलमोहर रोड येथील घराच्या ताबा प्रकरणात हिरानंदानी घेणार पोलीस अधीक्षकांची भेट. अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवरील पारिजात चौक परिसरात एका घरावर ताबा मारण्याच्या प्रकाराला आता वेगळेच वळण लागले असून चोर सोडून संन्यासाला फाशी असाच काहीसा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला आहे.
या प्रकरणातील गंगाराम हिरानंदानी यांनी ८ मे २०२३ रोजी शरदचंद्र विठ्ठलराव गुंजाळ यांच्या स्वमालकीचे गुलमोहर रोड वरील घर सर्व कायदेशीर बाबी परिपूर्ण करून विकत घेतले होते. त्यावेळी या व्यवहारामध्ये ही प्रॉपर्टी वडिलोपार्जित नसून आपल्या कष्टाने आणि स्वमालिकेचे असल्याचे या जमिनीचे मालक शरदचंद्र गुंजाळ यांनी हिरानंदानी यांना सांगितले होते. त्या वेळी कायदेशीर नोटीस घेऊन प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर उपनिबंधक कार्यालयात रीतसर कायदेशीर खरेदी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात जेव्हा गंगाराम हिरानंदानी विकत घेतलेल्या आपल्या जागेवर गेले असता त्या ठिकाणी शरदचंद्र गुंजाळ यांचे मोठे बंधू चंद्रशेखर गुंजाळ यांचा मुलगा बंटी गुंजाळ आणि त्यांची पत्नी त्या ठिकाणी राहत असल्याचं लक्षात आल्यानंतर ही प्रॉपर्टी मी विकत घेतली असून त्यामुळे आपण ती खाली करावी अशी विनंती गंगाराम हिरानंदानी यांनी चंद्रशेखर गुंजाळ यांना केली मात्र एक दोन वेळा समजावून सांगूनही घर खाली होत नसल्याने अखेर आपले घर ताब्यात घेण्यासाठी गंगाराम हिरानंदानी १९ सप्टेंबर रोजी गेले असताना चंद्रशेखर गुंजाळ, बंटी गुंजाळ व त्यांच्या पत्नीने गंगाराम हिरानंदानी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या काही कामगारांवर दगडफेक सुरू केली यावेळी गंगाराम हिरानंदानी यांनी बचावकरत त्या ठिकाणाहून निघून गेले मात्र हिरानंदानी यांचे कामगार आणि गुंजाळ यांची झटापट झाली मात्र या घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुंजाळ कुटुंबीयांनी खोटी फिर्याद देऊन गंगाराम हिरानंदानी यांच्याबरोबर खोटे आरोप करत हिरानंदानी आपल्या घरावर ताबा मारत असल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांनी गुंजाळ यांच्या फिर्यादी नुसार गंगाराम हिरानंदनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मात्र ही प्रॉपर्टी चंद्रशेखर गुंजाळ यांच्या मालकीची नसून त्यांचे मोठे बंधू शरदचंद्र गुंजाळ यांची असताना चंद्रशेखर गुंजाळ हे आपल्याच भावाच्या घरात ताबा मारून आपलेच घर असल्याचे सांगत आहेत. मात्र वास्तविकता वेगळी असून यामध्ये न्याय मिळावा यासाठी आता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे जाऊन सर्व कागदपत्रे सादर करणार आहोत तसेच या घराचे मूळ मालक शरदचंद्र गुंजाळ हे सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून खरी हकीकत सांगणार आहेत. त्यामुळे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून आपण घर खरेदी करूनही आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांवर आम्हाला विश्वास असून पोलीस यामध्ये योग्य ते मार्ग काढतील असा विश्वास गंगाराम हिरानंदनी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
त्यामुळे चंद्रशेखर गुंजाळ आणि त्याचे कुटुंबीय घरावर ताबा मारून बसले असून त्यांना बाहेर काढण्याची विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांना करणार आहे. असेही गंगाराम हिरानंदानी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: