लग्नात हुंडा मागण्याआधी लोक शंभर वेळा विचार करतील यात शंका नाही. या व्हिडीओत लग्न समारंभादरम्यान नवरदेवाने सासऱ्याकडे हुंडा म्हणून बाईकची मागणी केली, पण ही मागणी नवरदेवाच्या वडिलांना आवडली नाही म्हणून त्यांनी आपल्या मुलाला भर लग्नमंडपात चपलेने मारायला सुरुवात केल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ हुंडा मागणे चुकीचे असून तो मागितल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील हा धडा देणारा असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. शिवाय हुंडा मागणाऱ्या लोकांचे आणि नवरदेवाचे काय हाल होऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ असल्याचंही अनेकजण म्हणत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका वयस्कर व्यक्तीच्या हातात चप्पल आहे आणि त्यांनी नवरदेवाची कॉलर पकडली आहे. यावेळी ते नवऱ्या मुलाला चपलेने मारहाण करत आहेत. तसंच यावेळी ते म्हणतात, “चल, मी तुला शेत विकून मोटारसायकल घेऊन देतो. तुझ्या बायकोला घेऊन चल.” महत्वाची बाब म्हणजे नवऱ्याला मारणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून ते त्याचे वडील आहेत, जे हुंडा मागितला म्हणून आपल्या मुलावर रागावले आहेत.
दहेज में सिर्फ मोटरसाइकिल ही तो मांगी थी ,
ससुर जी ने क्या हाल कर दिया!
😢😢😢😢😢😢 pic.twitter.com/2BHEX7bwjt— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) November 17, 2023