हातावरील मेहेंदीमध्ये या नवरीने ज्याप्रकारे क्युआर कोड कोरला आहे, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरीचा हात दिसेल. तिच्या हातावर सुंदर मेहेंदी काढली आहे. मेहेंदीच्या अगदी मधोमध क्युआर कोड कोरला आहे. हा कोड पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हिडीओमध्ये म्हटलेय, “जेव्हा लग्नामध्ये गिफ्ट विसरला तेव्हा तुम्ही हे करा. व्हिडीओत दिसते की मेहेंदीमध्ये कोरलेल्या क्युआर कोडला एक महिला स्कॅन करतेय आणि त्यावर फक्त ११ रुपये टाकते पण त्यानंतर नवरी लगेच फोन हातात घेऊन ५००१ रुपये टाकते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही मजा येईल. काही लोकांना प्रश्न पडेल की खरंच मेहेंदीने क्युआर कोड स्कॅन करता येतो का?
Video : लग्नाचा आहेर घेण्यासाठी नवरीचा जुगाड! मेहंदीने हातावर कोरला क्युआर कोड
- Advertisement -