Saturday, June 14, 2025

अहमदनगर जिल्ह्यात नगरपरिषद फसवणूक प्रकरणी ठेकेदारावर गुन्हे दाखल

ठेकेदाराच्या विरोधात शेवगाव नगर परिषदने केला फसवणुकीचा गुन्हा दाखल.
शेवगाव : बँक गॅरंटी सह अन्य खोटे कागदपत्र सादर करुन, शेवगाव नगरपरिषद मार्फत शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानंतर्गत पाणी पुरवठा योजने टेंडर मिळविणाऱ्या, इंद्रायणी कंट्रक्शन छत्रपती संभाजीनगर, विरोधात शेवगाव नगरपरिषदेच्या वतीने, शेवगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तब्बल एक वर्षापूर्वी कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरु न केल्याने अगोदरच चर्चेत असलेल्या ठेकेदाराचे बिंग फुटले आहे. शेवगाव नगर परिषद प्रशासनाच्या वतीने लेखापाल सुग्रीव पांडुरंग फुंदे यांनी फिर्याद दिली आहे. इंद्रायणी कन्स्ट्रक्शन, छत्रपती संभाजीनगरचे सुनील मधुकर नागरगोजे यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले की, दि.२ फेब्रुवारी २०२३ रोजी पाणी पुरवठा योजनेची टेन्डर प्रक्रिया सुरु झाली. शेवगाव नगरपरिषद मार्फत महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानंतर्गत पाणी पुरवठा योजनेची टेन्डर प्रक्रियेची निवेदा इंद्रायणी कन्स्ट्रक्शन संभाजीनगर यांनी भरतेवेळी अनुभवाचे कागदपत्र शेवगाव जमा केले होते. सदर कागदपत्रांची तपासणी करुन ते पात्र ठरल्याने त्यांचा आर्थिक तक्ता ओपन करण्यात आला. प्राप्त निवेदा पैकी आर्थिक तक्तामध्ये ते सर्वात कमी दराचे असल्याने दि १२ मे २०२३ रोजी निविदा स्विकृती जा. क्र. ७३०/२३ नुसार पत्र देण्यात आले. संबंधित ठेकेदाराने मुदतठेव पावती क्र.एसबीआय, एफडीआय ४१९६६६८९१३३ दि. २ जून २३ रोजी १ कोटी ५६ लाख ६० हजार रुपये जमा करुन करारनामा करुन दि. ७ जून २३ रोजी जा.क्र. ८९९/२०२३ नुसार कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला.
परंतु सुनिल मधुकर नागरगोजे प्रोप्रायटर इंद्रायणी कन्स्ट्रक्शन संभाजीनगर यांनी जा.क्र पाणी पुरवठा योजना, शेवगाव /१५/२०२३ दि. ३० ऑगस्ट २३ रोजी बँक हमी पत्र जमा करुन मुदत ठेव पावती परत मिळणे करिता नगरपरिषद शेवगाव यांना पत्र दिले, सदर पत्रामध्ये बँक ऑफ बडोदा, नसोली गोपाल, हरदोई, उत्तरप्रदेश यांची बैंक गॅरंटी क्र.पि.बी.जी.एफ. बी.बी १५०१०१६३१० रक्कम रुपये १ कोटी ५६ लाख ६० हजार रुपये, दि २१ ऑगस्ट २३ रोजी नगर परिषद कडे जमा केली. त्यानुसार, वरील बँक गॅरेटी (हमीपत्र) नुसार त्यांना मुदत ठेव पावती परत करण्यात आली, त्यावेळी बँक गॅरेंटी email id-nasaul@bankofbaroda.com यावर पडताळणीसाठी पाठविले. NAREDRASINGH@bankofbaroda या मेल आयडीवरून दि.४ सप्टेंबर २३ रोजी सदरची बँक गॅरेंटी ही खरी असले बाबत कळवले. परंतु बैंक गॅरेंटीची रक्कम ही जास्त असल्याने शेवगाव नगर परिषदचे, पाणीपुरवठा अभियंता अतिरिक्त पदभार, सचिन राजभोज यांना प्राधिकृत करुन बैंक गॅरेंटीची मुळ प्रत घेऊन प्रत्यक्ष पडताळणीसाठी बँक ऑफ बडोदा, नसोलीगोपाल, हरदोई, उत्तरप्रदेश येथे गेले असता सदर बैंक अधिकारी अमरसिंग व नरेंद्रसिंग यांनी त्यांचे शाखेमार्फत सदर बँक गॅरंटी इंद्रायणी कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर सुनिल मधुकर नागरगोजे यांना दिली गेली नसल्याचे तसेच सदर बँक गॅरंटी खोटी, बनावट असल्याचे व उपरोक्त नमुद दोन्ही ईमेल आयडी है देखील बनावट असल्याचे बँक ऑफ बडोदा व्यवस्थापकाने लेखी कळविले. तसेच शेवगाव नगर परिषदने नगर परिषद किल्लेधारु जि. बीड यांना कामाचे अनुभव प्रमाणपत्र सत्यता पडताळणी करिता पत्र दिले असता मुख्याधिकारी किल्लेधारूर नगर परिषद यांनी सादर केलेले सदर अनुभव प्रमाणपत्र किल्लेधारुर नगर परिषदेच्या संचिकेत आढळून आलेले नाही. तसेच सदरील प्रमाणपत्राची जावक नोंदवहीत नोंद केल्याचे आढळुन आली नाही असे कळविले. खोटी बँक बँक गॅरंटी तसेच अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठेकेदार प्रत्यक्ष काम सुरु करण्यास टाळाटाळ करीत असल्याने, आमदार मोनिका राजळे यांनी, नगर परिषद प्रशासनाकडे सखोल चौकशी केली असता, काही बाबींचा संशय आल्याने कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत नगर परिषद प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार परिषदेने कागदपत्रांची तपासणी केली असता शासनाची फसवणूक झाल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. याबाबत नगरसेवक महेश फलके यांनी लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता. तसेच मनसेचे तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे यांनी चौकशी व्हावी यासाठी तहसील कार्यालया समोर उपोषण केले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles