Monday, July 22, 2024

नगरमधील आणखी एक मल्टीस्टेट पतसंस्था अडचणीत, संचालकांसह १६ जणांवर गुन्हा दाखल

नगर (प्रतिनिधी) – ठेवी वर ज्यादा दराने व्याज देण्याचे आमिष दाखवत महिलेकडून ९ वर्षांपूर्वी ९ लाख १२ हजारांची रक्कम ठेव म्हणून घेत सदर ठेवीची रक्कम व त्यावरील व्याज अशी सुमारे २८ लाख १४ हजारांची रक्कम परत देण्यास टाळाटाळ करत या ठेवीदार महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी नगर शहरातील श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटीच्या संचालकांसह १६ जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) १९९९ चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्नेहा राजेंद्र राजपाल (रा. उरण, नवी मुंबई) यांनी सोमवारी (दि.१) सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटीच्या कापडबाजार शाखेत सुरेश सुपेकर व इतर संचालक मंडळाने ठेवी वर ज्यादा दराने व्याज देण्याचे आमिष दाखवल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण दि.२१ मे २०१५ रोजी ९ लाख १२ हजार ८९४ रुपयांची ठेव ठेवली होती.

या ठेवीवर दि.३० एप्रिल २०२४ अखेर जमा झालेले व्याज आणि मुद्दल अशी एकूण २८ लाख १४ हजारांची रक्कम मागण्यासाठी गेलो असता संचालक मंडळाने चालढकल सुरु केली. अनेकदा पैसे मागूनही न दिल्याने संचालक मंडळाने आपली फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यावर आपण पोलिस ठाण्यात फिर्याद देत असल्याचे स्नेहा राजपाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सदर फिर्यादीवरून पोलिसांनी हेमा सुपेकर, अशोक गंगाधर गायकवाड, राहुल अरुण दामले, मनीषा दत्तात्रय कुटे, राजेंद्र सुखलाल पारेख, अजय चंद्रकांत आकडे, मधुकर मारुतराव मुळे, प्राजक्ता प्रकाश बोरुडे, धैर्यशील जाधव, नागनाथ भिकाजी शेटे, संजय चंद्रकांत खाडे, चंद्रकांत सुरजमल आनेचा, प्रकाश बाबूलाल बचावत, मच्छिंद्र भिकाजी खाडे, शामराव हरी कुलकर्णी, सुनील रंगनाथ वाघमारे (सर्व रा. अहमदनगर) या १६ जणांच्याविरोधात ठेवीदार महिलेची फसवणूक करून सदर रक्कमेचा अपहार केला म्हणून भा.दं.वि. कलम ४२०, ४०९, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पो.नि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला स.पो.नि. योगिता कोकाटे या करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles